या वर्षीची कार्तिक पौर्णिमा दिनांक 15 नोव्हेंबर 2024 शुक्रवारी सकाळी 6 वाजून 19 मिनिटांनी सुरू होते आणि 16 नोव्हेंबर शनिवारी दुपारी 2 वाजून 58 मिनिटांनी संपते.
या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेणे अतिशय शुभ मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन एरवी बायकांना वर्ज असते, पण या दिवशी बायका दर्शन घेऊ शकतात. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी आपल्याला जमेल तेवढे दान करणे शुभ मानले जाते. कपडे,पांढरी फुले ,तीळ ,अन्न, गूळ यापैकी काहीही आपण दान देऊ शकतो.
या दिवशी हे दान केल्याने माता लक्ष्मी, भगवान भोले शंकर, भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होऊन आपले जीवन सुखमय होते असा सर्वांनाच अनुभव येतो. या दिवशी दीप प्रज्वलन ही केले जाते.
यंदाच्या वर्षी कार्तिक स्वामींच्या दर्शनाची वेळ आहे 15 नोव्हेंबर रात्री 9 वाजून 55 मिनिटांपासून ते उत्तर रात्री 2 वाजून 58 पर्यंत. कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा.